किरकोळ वादावादीतून एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना कोंढव्यातील कौसरबाग परिसरात एका कॅफेजवळ शनिवारी मध्यरात्री घडली.
या प्रकरणी अब्दुल कुरेशी (रा. सय्यद नगर, महंमद वाडी ) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अब्दुल त्याच्या मैत्रिणीसोबत कॅफेच्या बाहेर बोलत उभा होता, त्या वेळी तिथं तीन जणांचं एक टोळक येऊन ‘इथं रस्त्यात थांबू नको ‘ असं सांगितल्याने त्याच रूपांतर वादात होऊन, त्या तिघांच्या टोलक्याने कॅफे समोरच्या गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली, त्यावेळी अब्दुलनेही आपल्या जवळच्या पिस्तूलाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली, सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.
