सुरक्षितेच्या दृष्टीने बेकायदेशिर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणार्यांवर कारवाई आवश्यक : डॉ. हाजी जाकिर शेख
पुणे : देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहेत. जे पर्यावरणांसाठी फायदेशीर आहेच, परंतू यासोबत निषकाळजीपणामुळे काही दुर्घटनाही होवू शकतात. जसे की सोसायटीत, घरी, ऑफीसच्या पार्कीग मध्ये अनाधिकृतपणे वायर जोडून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यास लावले जाते. यावेळी ओव्हर चार्जिंगमुळे वाहनात आग लागून मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने महावितरणतर्फे ’ईव्ही’ चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे याचा वापर केला पाहिजे, असे आवाहन करित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी डॉ. हाजी जाकिर शेख यांनी एका निवेदनाव्दारे अशा धोकादायक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणार्यांवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
वाढत्या पेट्रोलच्या किंमती व पर्यावरणपुरक म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापरात वाढ होत आहे. याच पार्श्चभूमीवर असे निर्दशनास आले की इलेक्ट्रिक वाहन वापर करते. गाडीमध्ये आपल्यासोबत वाहन चार्जिंगसाठी एक्सटेंशन बोर्डचा वापर करून सोसायटीतील पार्कीगमध्ये किंवा घरासमोर घरगुती मीटर वर वाहन चार्जिंगसाठी लावतात. तर काहीजण ऑफीस पार्कीगमध्ये जिथे कनेक्शन उपलब्ध होईल अशा ठिकाणी वाहन चार्जिंग करित असतात. काहीजण एकदा रात्री चार्जिंगसाठी वाहन लावून सकाळीच बंद करतात तर काहीजण ऑफीस मध्ये गेले की सकाळ पासून संध्याकाळपर्यंत वाहन चार्जिंगला लावतात. जे योग्य नाही यामुळे बॅटरी ओव्हर हिटींग होवून मोठी दुर्घटना होवू शकते. तसेच इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महावितरण’तर्फे चार्जिंग स्टेशन उभारल्यानंतर निकषात बसणार्या अर्जदारांना प्राधान्याने स्वतंत्र ईव्ही चार्जिंग वीजजोडणी देण्यात येत आहे. परंतू याचा वापर केला जात नाही, यामुळे महावितरण सह राज्य विद्युत विभागाचा महसुल मोठया प्रमाणत बुडत आहे. म्हणजेच एकीकडे दुर्घटनेचा धोका तर दुसरीकडे महसूल बुडत आहे. त्यामुळे सर्रासपणे विना परवाना वाहनांकरिता विज वापरणार्या अशा सोसायटीधारकांसह वाहना करिता विज वापरणार्या वाहनचालकांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी एका निवेदनाव्दारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी डॉ. हाजी जाकिर शेख यांनी महावितरण यांच्याकडे केली आहे. यासंर्दभात महावितरणसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडेही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
जर प्रशासना तर्फे योग्य कारवाई करण्यात आली नाही तर, पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉ. हाजी जाकिर शेख यांनी दिला आहे. सामन्या नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या प्रत्येक दुर्घटनेस प्रशासन जबाबदार राहील, असाही उल्लेख निवेदनात केला आहे.
तसेच नारिकांना आवाहन केले आहेक की, तुमचे इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना, योग्य चार्जर आणि चार्जिंग स्टेशनची काळजी घ्या. दुसरीकडे, जर तुम्ही घरी फास्ट चार्जर वापरत असाल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या घराच्या इलेक्ट्रिक सिस्टीमवर ओव्हरलोड करत नसाल तर सामान्य चार्जर वापरणे चांगले होईल. चार्जर बसवलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामान ठेवू नका. कारण आग लागल्यास आग पसरण्यापासून रोखता येईल. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे इलेक्ट्रिक वाहन रात्री ऐवजी दिवसा चार्ज करणे. याच्या मदतीने तुम्ही ओव्हर चार्जिंग टाळू शकता, जे आग लागण्याच्या संभाव्य कारणांपैकी एक आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या चार्जरवर, पण चार्ज करण्याची गरज भासली तरी चार्जर ओला होऊ नये हे लक्षात ठेवा.