नवी दिल्ली:
बाहेरील दिल्लीतील मंगोलपुरी भागात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री या खुनाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज असे मृताचे नाव असून तो मंगोलपुरी येथे राहत होता. त्याचा आरोपींसोबत जुना वाद होता. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे.