नवी दिल्ली:
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव सकाळी ८ वाजता काँग्रेस मुख्यालयात नेण्यात येणार असून, तेथे सकाळी ९.३० वाजेपर्यंत सर्वसामान्यांना दर्शन घेता येणार आहे. यानंतर त्यांची अखेरची यात्रा काँग्रेस मुख्यालयापासून सुरू होईल, ती निगम बोध घाटापर्यंत जाईल.
दुसरीकडे, हरियाणा सरकारने राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. शालेय शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, हरियाणातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत हिवाळी सुट्टी असेल. 16 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.