नवी दिल्ली:
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. पंचतत्वात विलीन होण्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा हे देखील काँग्रेस मुख्यालयात उपस्थित आहेत. डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय देशाच्या माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातील ज्येष्ठ नेते दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगम बोध घाटावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
व्हिडिओ: मनमोहन सिंग मृत्यू: पंजाबमधील एका गावात जन्म झाल्यापासून ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास.