नवी दिल्ली:
संसदेचे हिवाळी अधिवेशन आज सकाळी ११ वाजल्यापासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सोमवारपासून सुरू झालेले हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र, सोमवारी सुरू झाल्यानंतर काही वेळातच अधिवेशन तहकूब करण्यात आले. मंगळवारी संविधान दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनात एनडीए सरकारकडून वक्फ विधेयक पुन्हा एकदा मांडले जाणार आहे. याशिवाय 16 महत्त्वाची विधेयकेही मांडण्यात येणार आहेत.